पृष्ठे

सुत्रसंचलनाची सुत्रे

मित्रांनो !
आपणांसाठी सादर आहेत आदरणीय श्री अरविंदभाऊ शिंगाडे यांच्या संकल्पनेतील सुत्रसंचलनाची सुत्रे !
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
      ╭════════════╮                                                                                                                      
     🌈 *सूत्रसंचालनाची सूत्रे* 🌈
      ╰════════════╯
  *⫷⫸⫷⫸ पोस्ट क्र. १ ⫷⫸⫷⫸*

       मित्रहो नमस्कार, *महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या*माध्यमातून विद्यार्थीहिताचे आणि आपल्या ज्ञानात भर पाडणारे अनेक उपक्रम पॅनलचे अनेक शिलेदार आपणापर्यंत सातत्याने पोहोचवित आहेत. शाळेत , शाळेबाहेर  कुठलाही कार्यक्रम म्हटला की... *सूत्रसंचालन* आलेच मग तो शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्राशी संबंधित असो किंवा शालेय स्नेहसंमेलने, सत्कार सोहळे, निरोप समारंभ, दिनविशेष, कवीसंमेलन, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी असो. त्या कार्यक्रमाचे *सूत्रसंचालनच* कार्यक्रमाची यशस्वीता ठरवत असते.

         *सूत्रसंचालन* फक्त मंचावरील मान्यवरांना विनंती, श्रोत्यांना सूचना, निवेदन एवढयापुरतंच नसून संपूर्ण कार्यक्रमात समर्पक शब्दांनी मंच आणि श्रोते यांना आनंददायी साखळीत गुंफून ठेवण्याची कला आहे. कोणत्याही कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये *सूत्रसंचालकाचा* सिंहाचा वाटा असतो.
       गेल्या वीस वर्षांमध्ये विविध कार्यक्रमांचे *सूत्रसंचालन* करताना आलेले अनुभव खूप आनंददायी आहेत.    
          *सूत्रसंचालनात* यश मिळावे म्हणून ह्या कलेविषयी मी आजपासून दर गुरुवारी *महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या* माध्यमातून  हितगुज  करणार आहे.
*सूत्रसंचालनाची सूत्रे* हे साप्ताहिक सदर ह्या कलेविषयी आवड असणाऱ्या मान्यवरांना निश्चितच आवडेल. आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय यांचे स्वागत असेल. या लेखमालेत सूत्रसंचालनाची तांत्रिक माहिती, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, सूत्रसंचालनाची पूर्वतयारी या आणि इतर बाबी घेऊन दर गुरूवारी भेटू. तूर्तास एवढेच..
          🙏🙏🙏🙏🙏
*या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा,* *उजेडाचे दान देण्या झोपडीत सूर्य यावा.*            
              - संकलित
═══════🦋🦋═══════
             *अरविंद शिंगाडे*
                  *खामगाव*
                9423445668
═══════🦋🦋═══════
(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )
 ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈*


🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
      ╭════════════╮                                                                                                                      
     🌈 *सूत्रसंचालनाची सूत्रे* 🌈
      ╰════════════╯
  *⫷⫸⫷⫸ पोस्ट क्र. २ ⫷⫸⫷⫸*

      *सूत्रसंचालनाचे कार्यक्रमातील स्थान*

१ ) *सूत्रसंचालन एक कला:* सूत्रसंचालनामधून निवेदक, टी व्ही अँकर, रेडिओ निवेदक आणि डबींग आर्टिस्टकडे वाटचाल करण्याचा मार्ग जातो. त्यासाठी अभ्यास आणि आवड गरजेची आहे.
२ ) *कार्यक्रमाची यशस्वीता सूत्रसंचालनानेच :* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार?यावर कार्यक्रमाचा दर्जा आणि त्यातील रंजकता अवलंबून असते. सूत्रसंचालनात तोचतोपणा आला की कार्यक्रम रटाळ होतो.
३ ) *संवादी सूत्रसंचालन :* सूत्रसंचालन म्हणजे दोन भाषणांमधला अवकाश भरून काढणे नाही. समयसूचकतेचा वापर करुन श्रोत्यांच्या मनात पुढील कार्यक्रमाची उत्कंठा वाढविण्यासाठी संवादी सूत्रसंचालन प्रभावी ठरते.
३ ) *सहज सूत्रसंचालन:*श्रोत्यांची मानसिकता समजून न घेता लिहून आणलेले विनोद, कवितेच्या ओळी, शेर यामध्ये सूत्रसंचालकाने गुंतू नये, उलट अष्टावधानी राहून सहज कार्यक्रम पुढे न्यावा. हे करत असताना सूत्रसंचालन मूळ कार्यक्रमाच्या वरचढ होऊ नये याचे भान ठेवणेही आवश्यक आहे.
४ ) *कार्यक्रम फुलविणे :* लिहून आणलेलं निवेदन वाचणे म्हणजे सूत्रसंचालन असा समज झाला की कार्यक्रमातून सूत्रसंचालन वेगळं होते. सूत्रसंचालकाजवळ श्रोत्यांची नजर असणे गरजेचे असते. अशी काळजी घेतली की कार्यक्रम चांगला फुलतो.
५ ) *सूत्रसंचालनाचा अभ्यास :* सूत्रसंचालन जशी कला आहे तसे ते शास्त्रही आहे. त्यासाठी या कलेची अगोदर आवड निर्माण होणे नंतर शास्रोक्त पद्धतीने त्या कलेची विविध अंगे आत्मसात करणे गरजेचे ठरते. मानसशास्त्र, भाषाशास्त्र, सामान्यज्ञान, साहित्य, कला, क्रीडा, व्यक्तीमत्त्व विकास यासारख्या अनेक विषयांचा सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक ठरतो.
६ ) *सूत्रसंचालकाचे व्यक्तीमत्त्व :* कार्यक्रमाच्या वेळी मंचावरील पाहुणे आणि श्रोते या सर्वांचे लक्ष सूत्रसंचालकाकडे असते. त्याच्या सूचनांनुसार कार्यक्रम पुढे जात असतो. म्हणून सूत्रसंचालकाने आपली वेशभूषा, मंचावरील वावर या बाबतीत दक्ष असणे गरजेचे आहे.

*फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे?*
*घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही!*
*जरी या वर्तमानाला कळेना* *आमुची भाषा,*
*विजा घेऊन येणाऱ्या पिढयांशी बोलतो आम्ही!*
                          *-सुरेश भट*

क्रमश:  ......................
         
═══════🦋🦋═══════
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
             *अरविंद शिंगाडे*
                  *खामगाव*
                9423445668
═══════🦋🦋═══════
(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )
 ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈*

*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*                                                                                                                      
   *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

        *🖱पोस्ट क्र 3⃣🖱*

*गुरूवार दिनांक १६ नोव्हेंबर २०१७*
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵════┅┄🌀☀      🌀┄┅════🏵*

🗞━━━━♍💲🅿━━━━
      ╭════════════╮                                                                                                              *उत्कृष्ट सूत्रसंचालनाची तयारी*

१ ) *बहुश्रुतता*: सूत्रसंचालकाने विविध कार्यक्रम शक्य असेल तेव्हा लक्षपूर्वक ऐकावे. यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच शिवाय सूत्रसंचालन करताना आवश्यक त्या ठिकाणी संदर्भ म्हणून त्या माहितीचा उपयोग करता येतो. तसेच या काळात रेकॉर्डींग करणे सहज शक्य आहे. आपलेच सूत्रसंचालन ऐकले तर त्यातील उणीवा दूर करुन अधिकाधिक परिणामकारक सूत्रसंचालन करता येते.
२ ) *वाचनाची आवड जोपासावी :* पाठांतर  सूत्रसंचालनासाठी आवश्यक आहे परंतु पुरेसं नाही. केवळ काव्यपंक्ती, सुभाषिते इत्यादी पाठ करुन ठेवले तर सूत्रसंचालकाला कार्यक्रमात प्रसंगावधान राखता येईलच असे नाही. त्यासाठी वाचनाची आवड असणे अत्यावश्यक आहे. दररोज येणारे वर्तमानपत्र हा खूप मोठा स्रोत आहे. त्यामधून ताजे संदर्भ, प्रासंगिक विनोद, शब्दकोट्या यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करता आला तर सूत्रसंचालन प्रभावी ठरते.
३ ) *काळानुरुप स्वतःला अपडेट ठेवणे* :सूत्रसंचालकाचा वाचनाची प्रचंड आवड असणे आवश्यक आहे.ज्ञान आणि माहिती या बाबतीत सूत्रसंचालक *अपडेट* असणे आवश्यक आहे. सोबतच त्या ज्ञान आणि माहितीचा उपयोग समर्पकरित्या करता येणेही तितकेच महत्वाचे.
४ ) *वाचन :काय आणि कसे?*-
सूत्रसंचालकाने वाचन करताना महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या विषयांची टिपणे काढावीत.वर्तमानपत्रांसोबतच कविता -कादंबरी -ललित या साहित्याचं वाचन तसेच चरित्र, आत्मचरित्र यांचं वाचन करुन नोंदी ठेवाव्या. वाचनासोबत चिंतनही तितकेच महत्त्वाचे आहे.
५ ) *भाषेची जाण आणि अभ्यास*: मराठी भाषेतून सूत्रसंचालन करण्यासाठी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहेच. सोबत हिंदी, उर्दू, इंग्रजी इत्यादी भाषांचेही ज्ञान असणे गरजेचे आहे. वाचन करताना होणारी भाषेची ओळख प्रत्यक्ष भाषेचा वापर करतानाच पूर्णत्वास जाते. भाषेचा परिणामकारक वापर करण्यासाठी तिचे व्याकरण समजून घेणे आवश्यक आहे.
६ ) *स्वतंत्र ओळख निर्माण करणे* : अनेक नामवंत वक्ते, निवेदक यांनी विकसित केलेल्या शैलीचा अभ्यास करतानाच सूत्रसंचालक आपली स्वतंत्र ओळख निर्माण करु शकतो. आपल्या आवाजाला, उच्चारप्रणालीला कोणती शैली समर्पक राहील यावरुन सूत्रसंचालकाने आपली शैली विकसित करावी. शब्दफेक स्पष्ट, सहज आणि परिणामकारक असावी.आपले सूत्रसंचालन हे पूर्णपणे आपलेच असणे महत्त्वाचे आहे.

क्रमश:  ......................🙏🙏

" *पाठशाळा असावी सुंदर,* *जिथे मुले मुली होती साक्षर॥*
*काम करावयासी तत्पर,*
*शिकती जेथे प्रत्यक्ष ll*
                 - ग्रामगीता
   
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈**🏵═🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

═══┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*

*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*                                                                                                                      
   *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

        *🖱पोस्ट क्र 4⃣🖱*

*गुरूवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१७*
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵════┅┄🌀☀      🌀┄┅════🏵*

🗞━━━━♍💲🅿━━━━
      ╭════════════╮                                                                                                             *यशाचा  मंत्र : समयसूचकता*

सूत्रसंचालक अष्टावधानी असला तरच कार्यक्रमात रंगत येते.आत्मविश्वास, अभ्यास, साधना, सकारात्मक दृष्टीकोन यांसोबत सूत्रसंचालकाजवळ एक महत्त्वपूर्ण गुण असणे आवश्यक आहे, तो म्हणजे *समयसूचकता*.

"तुम्हाला कसं सुचतं हो वेळेवर? "श्रोत्यांकडून अशी प्रतिक्रिया अष्टावधानी आणि हजरजबाबी सूत्रसंचालकालाच मिळू शकते. सूत्रसंचालक संहितेमध्ये गुरफटून पडला की साचेबद्धपणा निर्माण होतो.
*समयसूचकतेची विविध अंगे:*
*१ ) उत्स्फूर्तता :*कार्यक्रमातील एखाद्या भागावर सूत्रसंचालकाचे निवेदन उत्स्फूर्तपणे येत असले तरच कार्यक्रमाला शिखरावर पोहोचविता येते.
*२ )बदलांची नोंद :* संहितेतील नियोजन अनेकदा जाग्यावरच राहतं आणि कार्यक्रम सुरु झाला की त्यामध्ये बदल करावे लागतात. अशावेळी सूत्रसंचालकाची खरी कसोटी असते. असे बदल कार्यक्रम संकेतांनुसार करण्याची जबाबदारी सूत्रसंचालकाला पूर्ण करणे आवश्यक असते.
*३ ) वेळेवर येणाऱ्या सूचना :* कधीकधी निवेदन सुरु असताना अचानक मंचावरील मान्यवर सूचना करतात, तर कधी प्रेक्षकांमधून एखादी सूचना किंवा टाँटिंग होते. अशावेळी गांगरुन न जाता शांततेत त्या सूचनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी समयसूचकताच लागते.
*४) कार्यक्रमस्थळाबाबत सजगता :*कार्यक्रम सुरु करण्याअगोदर आवश्यक बाबींची पूर्तता झाल्याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. सूत्रसंचालकाला सभागृह, मंडप, पटांगण इ च्या कानाकोपऱ्यापर्यंत नजर ठेवता आली पाहिजे तसेच मंचावर लक्ष ठेवून हालचाली टिपता येणंही तितकंच गरजेचं आहे.आयोजकांकडून पूर्वतयारीबाबत पूर्णपणे माहिती करुन घेऊन आवश्यक तेथे सूचना कराव्या.
ही समयसूचकतेची काही महत्त्वपूर्ण अंगे आहेत. समयसूचकता ही विविध अंगांच्या मदतीने प्रारंभीच अंगी रुजवता येईलही  पण यासाठी सरावही तितकाच गरजेचा आहे.

क्रमशः...................🙏🙏🙏

 *सफर में धूप तो होगी*,
*जो चल सको तो चलो*I
*सभी होंगे भीड़ में,*
*तुम भी निकल सको*
*तो चलो ll*
*किसी के वास्ते*
*राहें कहाँ बदलती है?*
*अपने आपको*
*बदल सको*
*तो चलो ॥"*
                       -संकलित
   
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈**🏵═🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

═══┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*

*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*                                                                                                                      
   *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

        *🖱पोस्ट क्र 5⃣🖱*

*गुरूवार दिनांक ३0नोव्हेंबर २०१७*

*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵════┅┄🌀☀      🌀┄┅════🏵*

🗞━━━━♍💲🅿━━━━
   *स्मरणशक्ती आणि भाषाज्ञान*

सूत्रसंचालनात समयसूचकतेचे महत्त्व या विषयी आपण मागील भागात चर्चा केली. सूत्रसंचालनासाठी *स्मरणशक्ती*आणि *भाषाज्ञान* या बाबींचीही आवश्यकता आहे.
वाचन सुरु झाल्यानंतर या विषयाच्या साधनेकडे वाटचाल सुरु होते. वाचनाची सवय आणि पूरकवाचन करणे हया गोष्टी सूत्रसंचालकाला आवश्यक आहेत. वाचन करताना एखादा साहित्यप्रकार वाचण्यात आला नाही तर फार काही फरक पडत नाही पण दररोजचे वर्तमानपत्र, त्यातील पुरवण्या यांचे नियमित वाचन तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी मदत करतील.स्मरणशक्ती उत्तम असणाऱ्या वक्त्याचे भाषण परिणामकारक होत असते. सूत्रसंचालनात प्रसंगानुरुप संदर्भ, काव्यपंक्ती, छोटे-छोटे किस्से, शेरोशायरी, क्वचित प्रसंगी गद्य उतारा यांचा उपयोग करावा लागतो. विशेषतः गद्यउतारा जसाच्या तसा वाचण्या -म्हणण्यापेक्षा त्याची मध्यवर्ती कल्पना ध्यानात ठेवून सूत्रसंचालकाला विषय रंगविता आला पाहिजे. काव्य-पंक्ती, शेरोशायरी मुखोद्गत असली तर सूत्रसंचालन भाव खाऊन जाते.
पाठांतरानंतरही वेळोवेळी संबंधित टिपणं नजरेखालून घालणं सुरु असलं तर ती सहज लक्षात राहतात.
*भाषाज्ञान:*सूत्रसंचालनात स्मरणशक्ती जितकी महत्त्वाची तितकंच भाषेविषयीचं प्रेमही आवश्यक आहे. त्याची सुरुवात उच्चारस्पष्टतेनं होत असते. सूत्रसंचालकाचे उच्चार अतिशय स्पष्ट हवेत. आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द त्याचा अर्थ सोबत घेऊनच आला पाहिजे, त्यासाठी आघात कुठे आणि कसा द्यावा याविषयी खूप सराव आवश्यक आहे. शब्दोच्चारातील थोडीशी चूक शब्दाचा /वाक्याचा अर्थ बदलवून टाकते. शब्दोच्चार हे स्पष्टता आणि योग्य ठिकाणी आघात यांच्यामुळेच चांगले होवू शकतात. लिखाणातील काना- मात्रा -अनुस्वारांप्रमाणेच उच्चारातही त्यांचे नियम पाळले तर बोलणं आणि बोलणारा परिणामकारक ठरेल.
( क्रमशः )......

*धूप मे निकलो*
*घटाओं मे नहाकर देखो,*
*जिंदगी क्या चीज़ है*
*किताबोंको हटा कर देखो,*
*सिर्फ आँखोसे ही जिंदगी*
*देखी नही जा सकती,*
*दिल की धडकन को भी,*
*नजर बनाकर देखो......॥*
           -संकलित
🙏🙏🙏🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈**🏵═🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

═══┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
         ( कृपया शेअर करा. )

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅═══🏵*                                                                                                                      
   *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*
( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 6⃣🖱*

*गुरूवार दिनांक 7 डिसेंबर २०१७*
     *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*═══┅┄🌀☀🌀┄┅═══*
 *कार्यक्रमाचे नियोजन करताना सूत्रसंचालकाने ध्यानात ठेवाव्या अशा महत्वपूर्ण बाबी*:

1) सूत्रसंचालन हा कार्यक्रम संपविण्याचा भाग नसून तो साकारण्याचा भाग आहे.

2) सूत्रसंचालन हा कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने श्रोत्यांशी साधावयाच्या संवादाचा आराखडा आहे.

3) सूत्रसंचालन ही सुनियोजित कार्यक्रमाची एक व्यवस्था आहे.

4) कोणताही कार्यक्रम आपल्या विशिष्ट वेगाने पुढे जात असतो, सूत्रसंचालन हे त्या कार्यक्रमातील *विसाव्याचे* ठिकाण असते.

5) सूत्रसंचालन हे कार्यक्रम फुलविण्यासाठी आणि रंगविण्यासाठी असते.

6 ) संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा सूत्रसंचालनाच्या व्यवस्थेवर अवलंबून असतो.

7 ) सूत्रसंचालकाला शिष्टाचार, कार्यक्रमाचे संकेत यानुसार निर्दोष कार्यक्रमपत्रिका तयार करणे आवश्यक असते.

8 ) कार्यक्रमाचे स्वरुप काय आहे?यानुसार आराखड्याची योजना सूत्रसंचालकाने करावी.

9) सूत्रसंचालकाने कार्यक्रमस्थळ, लागणारा वेळ याची माहिती  करुन घ्यावी.

10) कार्यक्रमामध्ये सहभागी होणारा श्रोतृवर्ग कोणत्या स्तरातील आहे?याची नोंद सूत्रसंचालकाने नियोजन करताना घ्यावी.

11) समर्पक काव्यओळींनी सूत्रसंचालन प्रभावी होत असते. कोणत्याप्रसंगी नेमक्या कोणत्या काव्य - पंक्तींचा उपयोग कुठे करावा हे अगोदरच ठरवावे.

12) कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाला मदतीसाठी काही जबाबदार लोक असतात. (उदा. प्रास्ताविक, आभार प्रदर्शन करणारे ) त्यांच्या उपस्थितीविषयी खात्री करावी.

13) प्राप्त परिस्थिती व साधनांचा योग्य वापर ही सूत्रसंचालकाची जबाबदारी असते.

14) सूत्रसंचालकाला सूत्रसंचालनाची तयारी ही विचारांशी सांगड घालून  मनातच करावी लागते.

15) सूत्रसंचालन ही वेळेवर करता येण्यासारखी गोष्ट नाही. अभ्यास, पूर्वतयारी असेल तरच ते प्रभावी होवू शकते.

        थोडक्यात सूत्रसंचालक हा कार्यक्रमरुपी रथाचा सारथीच असतो.प्रमुख पाहुणे, सत्कारमूर्ती, वक्ते हे कार्यक्रमाचे नायक असतात तर सूत्रसंचालक संपूर्ण कार्यक्रमाचा *दिग्दर्शक* असतो. त्याच्या सूचनांवरच कार्यक्रम पुढे जात असतो.

१. *"दिखावू कपडे कोरडी ऐट, नोकरपेशी थाटमाट॥*
*हे शिक्षणाचे नव्हे उद्दिष्ट,*
*ध्यानी घ्यावे नीट हे आधी॥*

२. *"विद्येअंगी व्हावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय ॥*
*शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवनजय करावया ॥*

                       *-ग्रामगीता*
*क्रमशः.................*

                  🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈*
          *✍🏻✍🏻✍✍✍*        
             *अरविंद शिंगाडे*
      *. खामगाव जि.बुलडाणा*
        *📱   9423445668*            
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
═══┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
        ( कृपया शेअर करा. )



 *🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                      
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 8⃣🖱*

*गुरूवार दिनांक २१ डिसेंबर २०१७*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
*सूत्रसंचालनाचे विविध प्रकार* ( विवेचन)

१ ) *दिनविशेष( जयंती, पुण्यतिथी व इतर )* :

       दैनंदिन शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे संस्कार व्हावेत, त्यांना थोरांच्या जीवनकार्याची ओळख होऊन प्रेरणा मिळावी यासाठी हे कार्यक्रम शाळेत आयोजित केले जातात. थोर नेत्यांच्या जयंती- पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन शाळेत दैनिक परिपाठात किंवा स्वतंत्ररित्या केले जाते. त्यासाठी *सूत्रसंचालन* विद्यार्थ्यांकडे सोपविले तर ते आनंदाने करतात. त्यासाठी त्यांना थोडे मार्गदर्शन करावे.
     थोर नेते, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, खेळाडू यांच्या जयंती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करावे. शाळेचे मुख्याध्यापक किंवा ज्येष्ठ शिक्षक यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारण्याबाबत विनंती करावी.
    सूत्रसंचालक विद्यार्थाने अध्यक्ष, प्रमुख अतिथी यांना आपापले स्थान स्विकारण्याची विनंती करुन प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन,हारार्पण करण्यासाठी निमंत्रित करावे.आवश्यक असेल तेथे  पाहुण्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाच्या *प्रास्ताविकासाठी* सूत्रसंचालकाने विद्यार्थी किंवा शिक्षक यांना निमंत्रित करावे.
       संबंधित थोर व्यक्तीच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारी भाषणे, प्रासंगिक कविता इ. यांचे क्रमशः सादरीकरण करण्याची सूचना सूत्रसंचालकाने करुन *प्रमुख अतिथींचे भाषण* व नंतर *अध्यक्षीय भाषण* यांसाठी विनंती करावी. कार्यक्रमाचा समारोप *आभार प्रदर्शनाने*करण्यासाठी सूत्रसंचालकाने कार्यक्रमपत्रिकेमधील विद्यार्थाला निमंत्रित करावे.
     काही दिनविशेष वेगळ्या पद्धतीने साजरे करता येतात. उदा. पर्यावरणदिनाला वृक्षपूजन , क्रीडादिनाला खेळाच्या साहित्याचे पूजन, शिक्षकदिनी विद्यार्थ्यांचे स्वयंशासन, बालकदिनी लहानमुलांना मंचावर स्थानापन्न करुन त्यांना खाऊ भेट देणे, ऑगष्ट क्रांतीदिनाला सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाचे कुटुंबीय यांचा सन्मान इत्यादी प्रकारांनी कार्यक्रमात नाविण्य आणता येते.

२ ) *विज्ञान प्रदर्शनी*

*उद्घाटन समारंभ :*
          दरवर्षी शैक्षणिक सत्रातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे विज्ञान प्रदर्शनी. हा कार्यक्रम शालेय , तालुका , जिल्हा , राज्य व राष्ट्रीय स्तरावर  होत असतो. विद्यार्थ्यांना अतिशय आवडणारा, नवीन अनुभूती देणारा उपक्रम म्हणून हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान प्रदर्शनीमध्ये *उद्घाटन समारंभ* व *पुरस्कार वितरण सोहळा* असे दोन भाग असतात. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन करताना निमंत्रण पत्रिकेमध्ये अगोदरच शिष्टाचाराप्रमाणे मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षणसंस्था किंवा शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी,विज्ञान शिक्षक संघटना पदाधिकारी, स्थानिक मुख्याध्यापक- शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग असतो.पूजनासाठी थोर वैज्ञानिकाची प्रतिमा दीपप्रज्वलनासोबत प्रदर्शनीमध्ये ठेवलेल्या एखाद्या प्रयोगाचे बटन दाबून दूरनियंत्रकाने उद्घाटन प्रभावी वाटते. विज्ञानज्योत मान्यवरांना हस्तांतरीत करणे, मान्यवरांचा सत्कार, प्रास्ताविक, उद्घाटनपर भाषण अध्यक्षीय भाषण आणि आभारप्रदर्शन असा उद्घाटन कार्यक्रमाचा क्रम असावा. कार्यक्रमादरम्यान भोजन, निवास, पार्कींग व्यवस्था, विविध समित्या याबाबतीत सूत्रसंचालकाने वेळोवेळी माहिती द्यावी.

*बक्षीस वितरण सोहळा :*
            विज्ञान प्रदर्शनीचा समारोप म्हणजे बक्षीस वितरण सोहळा. निमंत्रणपत्रिके प्रमाणे अध्यक्ष, अतिथी आणि परीक्षक यांना मंचावर स्थानापन्न करुन वैज्ञानिक प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करुन अध्यक्ष आतिथींचे स्वागत. प्रास्ताविकानंतर परीक्षकांचे मनोगत घेऊन अतिथींच्या हस्ते गटनिहाय बक्षीस वितरण घ्यावे.आभारप्रदर्शनाअगोदर संयोजनात असणाऱ्या सर्व समिती सदस्य, स्वयंसेवक यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करावा.
🙏🙏🙏🙏🙏🙏
...........................................

*जीवनाच्या गरजा संपूर्ण |*
*निर्वाहाचे एकेक साधन |*
*संबंधित विषयाचे समग्र ज्ञान |*
*याचा अंतर्भाव शिक्षणीll*
                              - ग्रामगीता

*आजचे सान सान बालI*
*उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील I*
*गावाचा पांग फेडतील | उत्तमोत्तम गुणांनीll*
                              - ग्रामगीता

*क्रमशः*..................................
                 🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*


 *🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*                                                                                                                      
   *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 7⃣🖱*

*गुरूवार दिनांक १४ डिसेंबर २०१७*
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵════┅┄🌀☀      🌀┄┅════🏵*

🗞━━━━♍💲🅿━━━ *सूत्रसंचालनाचे विविध प्रकार*
सूत्रसंचालन हे कार्यक्रमानुसार बदलावे लागते. प्रत्येक सोहळा हा स्वतंत्र असतो त्यामुळे सूत्रसंचालनाचा मूळ आधार एकच असला तरी कार्यक्रमाची पद्धत, त्यातील निवेदन आणि सादरीकरणाचे स्वरुप भिन्न असते. कार्यक्रमाचे प्रकार हे सूत्रसंचालनाला आकार देत असतात, त्यावरुन सूत्रसंचालनाचे प्रकार ठरतात.
      सूत्रसंचालनाचा आराखडा तयार करताना काय, कुठे, कसे, केंव्हा, का आणि कोण यांचा विचार करून योग्य ठिकाणी उपयोग करणे प्रभावी सूत्रसंचालनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे.
      सूत्रसंचालनातून कार्यक्रमाची यशस्वीता व समाधान प्राप्त करण्यासाठी त्याचे विविध प्रकार लक्षात घेणे गरजेचे आहे.
सूत्रसंचालनाचे काही महत्त्वपूर्ण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

*१) दिनविशेष (जयंती/पुण्यतिथी व इतर )*

*२) विज्ञान प्रदर्शनी*

*३) स्नेहसंमेलन*

*४)क्रीडामहोत्सव*

*५ ) वक्तृत्व स्पर्धा*

*६ )कवीसंमेलन*

*७) व्याख्यान*

*८)संगीत मैफल*

*९) पुस्तक प्रकाशन समारंभ*

*१०) पुरस्कार वितरण समारंभ*

*११) गझल मैफल किंवा कार्यशाळा*

*१२ ) शासकीय कार्यक्रम*

*१३) मुलाखत*

*१४)निरोप समारंभ*

*१५) चर्चा किंवा संवादाचे कार्यक्रम*

*१६ ) सामाजिक व राजकीय कार्यक्रम*

*१७) बैठक*

*१८) द्वारसभा*

*१९) वाढदिवस / विवाह समारंभ*

*२० )शोकसभा*

वरील सूत्रसंचालन प्रकारांनुसार नियोजनाचे सविस्तर विवेचन पुढील भागापासून.............🙏🙏🙏🙏🙏🙏
.............................................
१ )
*ओळखोनि गावाचि जबाबदारी,*
*शिक्षक जिव्हाळ्याने काम करी॥*
*मग गावच होई स्वर्गपुरी,*
*न पडे जरुरी कोणाची॥*
                              - ग्रामगीता
२ )
*या कोवळ्या कळ्यांमाजि,*
*वसति ज्ञानेश्वर,रविंद्र,शिवाजी ॥*
*विकसिता प्रगटतील समाजी,*
*शेकडो महापुरुष॥*
                              - ग्रामगीता

*क्रमशः*..............................................
🙏🙏🙏🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
    *🌈 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌈**🏵═🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

═══┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵════┅┄🌀☀🌀┄┅════🏵*
(कृपया शेअर करा )


 *🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                      
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 9⃣🖱*

*गुरूवार दिनांक २८ डिसेंबर २०१७*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
*सूत्रसंचालनाचे विविध प्रकार* ( विवेचन)

३) *वार्षिक स्नेहसंमेलन*

             विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात असा शालेय कार्यक्रम म्हणजे त्या -त्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन.

      एक किंवा एकापेक्षा जास्त दिवसांपर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन संपन्न होत असते.

           वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हस्तलिखित, मुद्रीत वार्षिकांकाचे प्रकाशन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे ही कार्यक्रम वार्षिक स्नेहसंमेलनात काही शाळा/ महाविद्यालयांमध्ये संपन्न होत असतात. वार्षिक स्नेहसंमेलन हे प्रामुख्याने दोन भागात संपन्न होते.

१.   *उद्घाटन समारंभ*
२. *सांस्कृतिक कार्यक्रम*

त्याचे *सूत्रसंचालन* करताना लक्षात ठेवावयाच्या काही महत्त्वपूर्ण बाबी.

१ ) *उद्घाटन समारंभ*-
           वार्षिक स्नेहसंमेलन हा वर्षभरातील महत्त्वपूर्ण कार्यक्रम असल्याने उद्घाटन समारंभ नियोजनपूर्वक पार पाडावा लागतो.

            संस्थेचे पदाधिकारी, शा व्य समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी,अधिकारी, पालक यांच्यापैकी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित असतात.विशेष वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी यांच्यापैकी कोणीतरी निमंत्रित असतात.

             उद्घाटन कार्यक्रमाच्यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारात सर्व अतिथींचे औक्षण ,तेथून ( शाळेतील उपलब्धतेनुसार ) शाळेच्या NCC, स्काऊट, लेझीम पथकाने पाहुण्यांना मंचापर्यंत आणावे. त्या अगोदर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध प्रदर्शनी असतील ( चित्र, रांगोळी, हस्तकला, शैक्षणिक साहित्य ) तर त्यांची पाहणी पाहुण्यांनी करावी. हे सर्व होत असताना सूत्रसंचालकाने आनुषंगिक सूचना आणि प्रासंगिक निवेदन करावे.

        प्रमुख मान्यवरांचे मंचावर आगमन झाल्यानंतर सर्वांना बॅजेस लावावेत. त्यानंतर *अध्यक्षांची सूचना- अनुमोदन,प्रतिमापूजन -दीपप्रज्वलन, स्वागतगीत, स्वागत- समारंभ, प्रास्ताविक ( अहवाल वाचन ) - मुख्याध्यापक, प्रकाशन सोहळा, विशेष सत्कार, प्रमुख वक्त्यांचा परिचय, मान्यवरांची भाषणे, प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन, अध्यक्षीय भाषण, आभारप्रदर्शन* या पद्धतीने ( आवश्यक तेथे बदल करुन ) सूत्रसंचालकाने कार्यक्रम पुढे न्यावा.

२.     *सांस्कृतिक कार्यक्रम*

विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे स्नेहसंमेलनाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. सूत्रसंचालक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला अधिक बहारदार बनवू शकतो, त्यासाठी सूत्रसंचालकाने काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या. कलाप्रकारानुसार सादरीकरणाचा क्रम परिणामकारक ठरतो, तसे नियोजन सूत्रसंचालकाने करावे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची कार्यक्रम -पत्रिका कार्यक्रमाचे नाव, सहभागी विद्यार्थी, संबंधित शिक्षक, त्या सादरीकरणासाठी लागणारा अंदाजे वेळ यांसह तयार करावी.

               नियोजनाप्रमाणे तयार राहण्यासाठी सहभागी विद्यार्थ्यांना अगोदर सूचना देऊन ठेवावी. निवेदन करताना कार्यक्रमानुसार काव्यपंक्ती, सुभाषिते, शेर इत्यादींचा     प्रासंगिक उपयोग करावा.

            एखादेवेळी दोन सादरीकरणामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला तर प्रेक्षकांना ( विद्यार्थी ) खिळवून ठेवण्याचे कौशल्य सूत्रसंचालकाजवळ असावे. पुढे सादर होणाऱ्या कार्यक्रमांच्या बाबतीत श्रोत्यांमध्ये उत्कंठा निर्माण करणे सूत्रसंचालकाचे महत्त्वाचे काम आहे, त्यासाठी खूप वाचन आणि अभ्यास महत्त्वाचा आहे.

           सांस्कृतिक कार्यक्रमात सादर होणाऱ्या विविध कला गायन, नृत्य, अभिनय, संगीत इत्यादीविषयी माहिती करुन घेणे व तिचा सूत्रसंचालनात उपयोग करणे ही काळजी सूत्रसंचालकाला घ्यावी लागते.

            प्रेक्षकांनी सादरकर्त्या विद्यार्थांना वारंवार प्रेरित करावे म्हणून सूत्रसंचालकाने आपल्या निवेदनात वैविध्य आणणे गरजेचे आहे. वाचन, पूर्वतयारी आणि आत्मविश्वास यामुळे हे सहज शक्य आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
...........................................

*रात नही ख्वाब बदलते है,*
*मंजिल नही रास्ते बदलते है ॥*
*ज़ज्बा रखो हमेशा जितने का,*
*क्योंकी तकदीर चाहे बदले ना बदले,*
*लेकिन वक्त जरुर बदलता है ॥*

                              -संकलित
                           

*क्रमशः*..................................
                 🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                      
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 1⃣0⃣🖱*

*गुरूवार दिनांक ४ जानेवारी २०१८*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
*सूत्रसंचालनाचे विविध प्रकार* ( विवेचन )

*क्रीडामहोत्सव :*

         शाळा,महाविद्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणारा वार्षिक क्रीडामहोत्सव म्हणजे संघभावना, जिंकण्याची तीव्र इच्छा, खिलाडुवृत्तीचे संस्कार देणारी कार्यशाळाच.

या महोत्सवात नावारूपास आलेले खेळाडू भविष्यात यशाची उंच शिखरे गाठताना दिसतात. शाळा -महाविद्यालयस्तरावर अजिंक्य ठरणारे संघ, खेळाडू पुढे तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली चुणूक दाखवितात. विविध विभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांचे क्रीडामहोत्सवही प्रत्येक स्तरावर थाटात संपन्न होत असतात.

     क्रीडामहोत्सव उद्घाटन व पुरस्कार-वितरण अशा दोन भागात संपन्न होतो, त्या दोन्ही कार्यक्रमांचे *सूत्रसंचालन* प्रभावी व्हावे म्हणून काही महत्त्वपूर्ण बाबी सूत्रसंचालकाने आत्मसात करुन अशा कार्यक्रमांचे  निवेदन करावे.

*उद्घाटन समारंभ :*

         सर्व खेळाडू संघानिहाय मैदानात शिस्तीत बसलेले आहेत, त्यांच्या संघाचे ध्वज नेतृत्व करणाऱ्या खेळाडूच्या हाती असल्याची खात्री करणे. संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच, सहयोगी स्टाफ इ नियोजीतस्थळी सन्मानपूर्वक स्थानापन्न करणे. उद्घाटक, अध्यक्ष, अतिथी यांना मंचावर स्थान स्विकारण्याची विनंती करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करून तो खालील क्रमाने पूर्ण करावा.

*दीपप्रज्वलन , प्रतिमापूजन*

*स्वागतगीत*

*प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय*

*क्रीडामहोत्सव ध्वजारोहण* / *आकाशात फुगे किंवा कबुतरे सोडणे*

*मानवंदना*

*क्रीडाज्योत आगमन ( गतविजेते खेळाडू )*

*खेळाडूंना शपथ देणे*

*उद्घाटनपर भाषण*

*मान्यवरांची भाषणे*

*अध्यक्षीय भाषण*

*उद्घाटनपर सामना ( अतिथींनी खेळाडूंचा परिचय मैदानावर घेतल्यानंतर)*

*आभारप्रदर्शन*
.............................................

*समारोपीय कार्यक्रम( पुरस्कार वितरण )*


          क्रीडामहोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात विजेते संघ व खेळाडू यांना अतिथींच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्याचा मुख्य कार्यक्रम असतो. प्रमुख अतिथींसमोर एखादया सामन्याची अंतिम फेरी पूर्ण करुन पुरस्कार वितरण कार्यक्रम सुरु करावा.
     कार्यक्रम संकेतानुसार सूत्रसंचालकाने टप्पे पार पाडावयाचे असतात.

*दीपप्रज्वलन -प्रतिमापूजन*

*स्वागतगीत*

*स्वागतसमारंभ*

*प्रास्ताविक*

*पंच- सामनाधिकारी यांच्यासह इतर सहकार्य करणाऱ्यांचा विशेष सत्कार*

*पुरस्कार वितरण ( उपविजेते, विजेते ) या क्रमाने*

*मान्यवरांची भाषणे*

*अध्यक्षीय भाषण*

*आभारप्रदर्शन*

*( क्रीडामहोत्सव उद्घाटन, समारोपीय कार्यक्रमपत्रिकेतील क्रमवारीमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतात )*
.............................................

*"हाथ की लकिरों पे कभी विश्वास मत करना,क्योंकी तकदीर उनकी भी होती है जिनके हाथही नही होते.......... ॥"*
-संकलित

*"अपने इरादों को कभी यह मत बताओ की मेरी परेशानी कितनी बडी है,*
*अपनी परेशानी को यह बताओ की मेरा हौसला कितना बड़ा है.......॥"*

-संकलित

         *क्रमशः................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्याl वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                      
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 1⃣1⃣🖱*

*गुरूवार दिनांक ११ जानेवारी २०१८*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
*सूत्रसंचालनाचे विविध प्रकार* ( विवेचन )

*वक्तृत्व स्पर्धा*

         शाळा,महाविद्यालये, शासकीय व सामाजिक संस्था वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करतात. एखाद्या विशिष्ट विषयावर , नेमून दिलेल्या वेळेत आपले मत प्रभावीपणे व्यक्त करणे या स्पर्धेत अपेक्षित असते. शाळा, महाविद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात आणि संस्थांमध्ये प्रासंगिक स्वरुपात *वक्तृत्व स्पर्धांचे*आयोजन केले जाते.
      *समयस्फूर्त भाषण,* *वादविवाद* आणि *बचाव स्पर्धा* यांसारखे वैविध्य यामध्ये ठेवून हा उपक्रम अधिकाधिक प्रभावी करण्यास मदत होते. अशा विविध वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भविष्यातील प्रभावी वक्त्यांसाठी पूर्वतयारीची संधीच असते. या स्पर्धांच्या संयोजनात *सूत्रसंचालकाची* भूमिका महत्त्वाची असते.
       स्पर्धा म्हटली की त्यामध्ये जय- पराजय आलाच. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी एकापेक्षा जास्त असतात, त्यांच्यापेक्षा  परिणामकारक वक्तृत्वाने पुढे जाणे असे प्रत्येकाला वाटणे क्रमप्राप्त ठरते. सूत्रसंचालक हा स्पर्धेचा नियामक म्हणून सुद्धा महत्त्वपूर्ण असतो.ह्या प्रकारात सूत्रसंचालक मालिका तयार करणाऱ्याच्या भूमिकेत असतो.
       स्पर्धेच्या निमित्ताने निमंत्रित मान्यवर, परीक्षक, वेळ नियंत्रक यांना मंचावर , प्रेक्षक आणि स्पर्धकांना नेमून दिलेल्या जागी बसण्याची विनंती करुन कार्यक्रम खालील क्रमाने सुरु करावा.

 *अध्यक्षांची सूचना /अनुमोदन*

*दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन*

*स्वागत समारंभ*

*प्रास्ताविक-*यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचा विषय, वेळ, नियम या बाबींविषयी माहिती अपेक्षित आहे.

*स्पर्धकांना क्रमाने सादरीकरणासाठी निमंत्रित करणे*

*परीक्षकांचे मनोगत*

*अध्यक्षीय भाषण*

*आभार प्रदर्शन*

           दोन स्पर्धकांच्यामध्ये निवेदन करताना पुढील स्पर्थकांना विषय प्रतिपादनासाठी दिलेली वेळ व इतर नियमांची सूत्रसंचालकाने वेळोवेळी जाणीव करुन द्यावी.

*(स्पर्धेच्या निकालाची तारीख व वेळ याविषयी स्पष्ट सूचना सूत्रसंचालकाने कार्यक्रम संपण्याअगोदर सर्वांना द्यावी. )*

.............................................

*"सूर्यासमान देती उधळून जे स्वतःला,*
*त्यांची प्रकाशगाणी घुमती दिशात दाही ॥"*

*-श्रीकृष्ण राऊत*

*"कागदावर नभाच्या लिहू मातीची अक्षरे,*
*परिवर्तनाचे गाणे श्वासा-श्वासातून स्फुरे..... ! "*

*- किशोर बळी*
   


क्रमशः...........................
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आहेत. तसेच दैनिक सकाळच्याl वऱ्हाड आवृत्तीत दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ' ऑफ पिरियड ' चे स्तंभलेखक आहेत )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                      
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 12 🖱*

*गुरूवार दिनांक १८ जानेवारी २०१८*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
*आपला आवाज, आपली संपत्ती*

         मित्रहो, *सूत्रसंचालन* ही एक कला आहे. आवड, छंद ही या कलेची सुरुवात असते आणि पुढे या कलेला जीवापाड जपण्यासाठी प्रयत्न केले जातात.

            एखाद्या छंदाचे व्यवसायात रुपांतर होणे ही खरं तर फारच आनंदाची गोष्ट. आता *सूत्रसंचालन* हा म्हटलं तर छंद आणि ठरवलं तर फार मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे ह्या कलेला समृद्ध करण्यासाठी सूत्रसंचालकाने काही गोष्टी जपणे आवश्यक आहेत. आपण जाणीवपूर्वक काळजी घेतली तर प्रत्येक कार्यक्रम *सूत्रसंचालक* म्हणून अधिक आनंद देणारा ठरेल.


*आवाज हेच बलस्थान*

    सूत्रसंचालनात सर्वात जास्त महत्व कशाला असेल तर आवाजाला. आवाज ही प्रत्येक व्यक्तीची स्वतंत्र ओळख असते. सूत्रसंचालनात आवाज ही करिअरच्या दृष्टीने अतिशय मोलाची बाब आहे. या आवाजाची काळजी घेणे तितकंच महत्वपूर्ण काम.

        आवाजाच्या आरोग्यासाठी, आवाज जोपासण्यासाठी काही बाबींची काळजी घेतल्या गेलीच पाहिजे.

*श्वास*

         श्वासावर तुमचं नियंत्रण असलं की संवादकौशल्य बहरलं म्हणून समजा. श्वासावर नियंत्रण मिळविणे ही साधना आहे. प्रयत्नपूर्वक काही बाबींची काळजी घ्यावी लागते. निसर्गतः प्राप्त आवाज म्हणजे आपली ओळख,तो जपणे आणि निवेदन-सूत्रसंचालनासाठी आवश्यक आवाज तयार करणे हे क्रमप्राप्त ठरते.

           आपण जो श्वास घेतो त्याप्रमाणेच आवाजाला लय मिळू शकते, श्वासाचा संबंध आवाजाशी असल्याने श्वास नियंत्रण करणे सरावाने साध्य करावे. दीर्घ संवादात धाप लागणे, अस्पष्ट उच्चार इत्यादी टाळण्यासाठी सूत्रसंचालकाने प्रयत्न करावे.

      आपले व्यक्तीमत्त्व फुलविण्यासाठी आपला आवाज महत्त्वपूर्ण असतो. आवाजातून प्रभाव टाकता येतो, आवाज हीच आपली ओळख होते.

        श्वासावर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यायाम, ध्यान,प्राणायाम , योगासने यांचा उपयोग होतो.

            तसेच आवाजाच्या शुद्धतेसाठी आहार विषयक काही पथ्ये पाळणेही आवश्यक आहे. स्वरयंत्र हा आवाजाचा मुख्य स्रोत आहे, ते नाजूक असते त्यामुळे त्याची निगा राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

*१)बोलताना स्वरयंत्रावर ताण पडेल एवढया मोठयाने बोलू नये.*

*२)रागावर नियंत्रण करावे आणि एकदम ओरडून बोलू नये.*

*३)आवश्यक तेथेच शब्दांवर आघात द्यावा.*

*४) आपल्या भावना संयमी भाषेत व्यक्त कराव्या.*

*५)शब्दांचे स्पष्ट उच्चारण करावे. ते करताना अनावश्यक लकबी टाळाव्या.*

.............................................

   
१ )
*"आम्हाघरी धन शब्दांचीच रत्ने |*
*शब्दांचीच शस्त्रे यत्ने करु|*
*शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन |*
*शब्दे वाटू धन जन लोका ॥"*
           -संत तुकाराम

२ )
*" अच्छे बुरे की तुम्हे खबर देकर जाऊंगा I*
*चेहरों को पढ़ने की नज़र देकर जाऊंगा |*
*यारो मै इस सदी का वो पत्थर-तराश हूँ ,*
*की गुँगो को बोलने का हुनर देकर जाऊँगा ॥*
-संकलित

*क्रमशः...........................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*            
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*                                                                                                                 *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

        *🖱पोस्ट क्र 1⃣3⃣🖱*

*गुरूवार दिनांक २५ जानेवारी २०१८*
      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
🗞━━━━♍💲🅿━━━🗞
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

          सूत्रसंचालनात आपला आवाज हीच आपली स्वतंत्र ओळख असते. सूत्रसंचालकाने सर्व बाजूंनी आपले आवाजी वेगळेपण जपण्याचा व अधिकाधिक परिणामकारक करण्याचा सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
       आवाजावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आवाजाचा दर्जा सुधारला जातो. श्वास नियंत्रणासोबत जीभ, जबडा, ओठ यांची सहज हालचाल, स्पष्ट शब्दोच्चार, शारीरिक व मानसिक संतुलन या बाबींची काळजी घेण्यासाठी पुढील पायऱ्या पार करणे आवश्यक आहे.

*समजपूर्वक श्रवण*

             जेवढे जास्त आपण समजपूर्वक श्रवण करु तेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला ज्ञात होतील. विचारप्रवण होऊन संवादशास्त्रातील विविधता टिपता येईल, म्हणजेच आपण स्वतःमध्ये जास्तीतजास्त सकारात्मक बदल घडवू शकतो. समजपूर्वक श्रवण ही महत्त्वपूर्ण साधना आहे. सूत्रसंचालकासाठी हे आवश्यक आहे.

*श्वासनियंत्रण*

            श्वास घेणे ही जशी मूलभूत बाब आहे तशीच तो विशिष्ट लयीत घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. श्वासाचे नियमित व्यायाम आपल्या आवाजाची महती टिकविण्यासाठी आवश्यक आहेत. सूत्रसंचालकाला योगाभ्यास, ध्यानसाधना, सतत स्वरनिर्मिती यातून ते साध्य करता येते.
   
*सातत्य*
 
    आवाजाच्या पट्टीवर नियंत्रण मिळविणे, आवाज कमी -जास्त करणे ही एक कला आहे. यासाठी सराव आणि सातत्य आवश्यक आहे.आवाजाची क्षमता वाढविण्यासाठी विविध साहित्यप्रकारांचे ( काव्य, नाटक, गज़ल )प्रकटवाचन करणे आवश्यक आहे. जेथे शक्य आहे तेथे सूत्रसंचालकाने आपला आवाज रेकॉर्ड करुन पुन्हा- पुन्हा ऐकावा याचा निश्चित फायदा होतो .
       आपल्या निवेदनात सातत्य, सराव असला तर स्नायूंचा व्यायाम होतो. संवादाचा वेळ, वाचनाचा वेग ठरवता येतो. त्यातून निश्चित सूत्रसंचालकाचा आत्मविश्वास वाढतो.

*शारीरिक आणि मानसिक तयारी*
           श्वसनसंस्थेची निगा ही आवाजाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक बाब आहे. हे ध्यानात ठेवून आपला आहार निश्चित करावा. कोणत्याही खाद्यपदार्थांचा अतिरेक जसे अतिउष्ण, अतिथंड आवाजाला घातक ठरतो.
      मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक सक्षमतेवर अवलंबून असते त्यामुळे आत्मविश्वास, व्यवसायनिष्ठा, सकारात्मक विचार, भावनांवर नियंत्रण यांसारखे गुण सूत्रसंचालकाच्या अंगी असणे आवश्यक आहे.
.............................................

१ )
*"डर मुझे भी लगा फासला देखकर,*
*लेकीन मै बढ़ता गया रास्ता देखकर,*
*खुदबखुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल,*
*मेरा हौसला देखकर ॥ "*

                          -संकलित
२ )

*क्षितीज जसे दिसते*
*तशी म्हणावी गाणी*II

*देहावरची त्वचा आंधळी*
*छिलून घ्यावी कोणी*II

*गाय जशी हंबरते*
*तसेच व्याकूळ व्हावे*II

*बुडता बुडता सांजप्रवाही*
*अलगद भरूनी यावे*Il

                    *-ग्रेस*

*क्रमशः...........................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*
*📱         9423445668*             
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*       
                                                                                                        *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

    *🖱पोस्ट क्र 1⃣4⃣🖱*

*गुरूवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०१८*

      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

🗞━━━━♍💲🅿━━━🗞

        मित्रहो, *सूत्रसंचालन* हा कोणत्याही कार्यक्रमाचा प्राण असतो. त्या कार्यक्रमाला उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळेच पूर्णत्व प्राप्त होते. साहजिकच *सूत्रसंचालकसुद्धा* कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरत असतो. त्याचा आवाज हीच त्याची ओळख असते म्हणून सूत्रसंचालकाने आपल्या *आवाजाचे आरोग्य जपण्यासाठी* काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या. त्या खालीलप्रमाणे:

*१ ) कोमट पाण्यात थोडं मीठ टाकून गुळणा करावा ( ५ मिनिटांपर्यंत )*

*२) दररोज सकाळी नियमितपणे एक ग्लास कोमट पाणी प्या.*

*३ ) आवाजाचे आरोग्य टिकविण्यासाठी ज्येष्ठमध गुणकारी आहे, त्याची काडी चघळावी.*

*४ ) ओवा, लवंग, ज्येष्ठमध, बडीशेप अशा पाचक साहित्याचे जेवणानंतर सेवन अतिरिक्त कफ घालविण्यास मदत करते.*

*५ ) घशासाठी खडीसाखर चघळणे हितकारक असते.*

*६ ) गरम दुधात हळद मिसळून ते नियमित घ्यावे.*

*७) रोजच्या जेवणातून साजूक तूप सेवन करणे आवाज चांगला ठेवण्यास मदत करते.*

*८) हळद आणि मिठाच्या गुळण्या बसलेला आवाज ठीक करण्यास मदत करतात.*

*९) घशाचा त्रास जाणवल्यास लवंग तोंडात धरुन चघळा.*

*१०)मर्यादित प्रमाणात कंठसुधारक वटीचे सेवन केल्यास आवाज चांगला राहतो.*

*११)दररोजच्या चहात तुळस, सुंठ / अद्रक, गवती चहा यांचा वापर करावा.*

*१२)दररोज सकाळी मधाचे काही  थेंब घेतल्यास आवाजाची शुद्धता व गोडवा वाढवण्यास मदत करतात.*

*१३) कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने अधूनमधून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.*
.............................................

१ .
*" तुझिया श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुजकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वामाजि या योगें ॥"*
-वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


*"कविता नंतर फुलते*
*आधी आपण फुलून यावे लागते*
*गाणे नंतर जुळते*
*आधी आपण गाणे व्हावे लागते*
                         - प्रवीण दवणे

*क्रमशः...........................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍✍✍

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*

*📱         9423445668*             
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*       
                                                                                                        *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

    *🖱पोस्ट क्र 1⃣5⃣🖱*

*गुरूवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०१८*

      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

🗞━━━━♍💲🅿━━━🗞

        मित्रहो, *सूत्रसंचालन* ह्या कलेच्या विविध पैलूंविषयी आपण चर्चा करित आहोत.      *सूत्रसंचालक* नेहमी प्रभावी भाषण करु शकतो किंवा चांगला वक्ता होईलच असे ठामपणे सांगता येणार नाही. *सूत्रसंचालन* आणि भाषण ह्या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत. *सूत्रसंचालक* हा विचारपीठावर वेगळ्या भूमिकेत वावरत असतो तर वक्ता भाषणातून आपल्या विषयाची त्याच्या पद्धतीने मांडणी करणार असतो. तरीही   *सूत्रसंचालनाच्या*अभ्यासातच वक्त्याचे अनेक पैलू नकळत समोर येतात. प्रभावी वक्ता होण्यासाठी ह्या बाबी निश्चित मार्गदर्शक ठरतात.
       *सूत्रसंचालनाची* आवड असणारे लोक ते अधिकाधिक प्रसंगोचित, समयस्फूर्त , नेटके, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी होण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.
         *सूत्रसंचालन*  केवळ औपचारिकता न राहता कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे.
         आवाजाच्या आरोग्यासाठी काय करावे हे आपण मागील भागात पाहिले होते. सुंदर आवाजाला घातक असणाऱ्या कोणत्या गोष्टी *सूत्रसंचालकाने* टाळाव्या त्याबाबत आज बोलू.



*१) नेहमीसाठी फ्रीजमधील थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, हे टाळावे.*

*२ ) तेलकट, कफजन्य पदार्थ, अति तिखट, आंबट, तुरट पदार्थांचे सेवन टाळावे.*

*३) दही, ताक, आंबट फळे यांचा आहारात मोठया प्रमाणातील समावेश टाळावा*

*४)दररोज नियमित पुरेशी झोप आवश्यक असते. जास्त जागरण टाळावे.*

*५) दररोज स्नानासाठी कोमट पाणी वापरावे, थंड पाण्याने स्नान करु नये.*

*६)ए सी चा अतिवापर किंवा खूप वेळ कोरडया हवेमध्ये राहणे हया दोन्ही बाबी आवाजावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या आहेत. त्या टाळाव्या.*

*७) घसा चांगला राहण्यासाठी सुपारी आणि सुपारीजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.*

*८)आवाजाच्या स्वास्थ्यासाठी कोणतेही व्यसन ( तंबाखू, धुम्रपान, मद्यपान )घातकच म्हणून व्यसने करु नये*

१ )
*" होऊ द्या ना वाद पण संवाद झाला पाहिजे, माणसांच्या स्पंदनांचा नाद झाला पाहिजे. एक इवलीशी सादही राहू न द्यावी पोरकी, जागत्या हृदयातून पडसाद आला पाहिजे."*
-संकलित

२)

*"सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशीश ये है की यह सुरत बदलनी चाहिए I"*
                           -दुष्यंतकुमार


*क्रमशः...........................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍✍✍

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*

*📱         9423445668*             
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*


*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*       
                                                                                                        *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

    *🖱पोस्ट क्र 1⃣6⃣🖱*

*गुरूवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१८*

      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

🗞━━━━♍💲🅿━━━🗞

मित्रहो, *सूत्रसंचालक* हा कार्यक्रमरुपी मालेतील धागा असतो. सगळ्या फुलांना एकत्रित गुंफून ठेवतो आणि स्वतः त्या हाराचा अदृश्य भाग होतो. त्यामुळे फुलांच्या हाराला मूर्तरुप येणं धाग्याशिवाय अशक्य आहे तसंच कोणताही कार्यक्रम सूत्रसंचालकाशिवाय अपूर्ण असतो.

       *सूत्रसंचालक* कार्यक्रमाची रंगत वाढवतो. तोच कार्यक्रमाला पुढे नेतो, सोबतच कार्यक्रमात नेटकेपणा ठेवण्याची आणि वेळेच्या आत कार्यक्रम आटोपण्याची जबाबदारी पण *सूत्रसंचालकाचीच* असते. 

          यासाठी त्याने सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की, हा कार्यक्रम *सूत्रसंचालकाचा* नाही. वेळेचं नियोजन ही सूत्रसंचालकाची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. हे पूर्वनियोजन करताना श्रोत्यांची मानसिकता लक्षात घेऊन वेळेची कल्पना कार्यक्रमात सहभागी वक्ते व मान्यवरांना द्यावी.

           *वेळेचे नियोजन*

       कार्यक्रमातील प्रसंग ( स्वागत, पूजन, सत्कार इ ), दोन वक्त्यांच्या भाषणातील निवेदन यासाठी *सूत्रसंचालक* म्हणून आपण किती वेळ घेणार याचं नियोजन आवश्यक आहे. श्रोते, वक्ते, पाहुणे,आयोजक यांना अवघडल्यासारखं होईपर्यंत सूत्रसंचालकाने वेळ घेतला तर कार्यक्रमाचा बेरंग होण्यास उशीर लागणार नाही. त्यासाठी आपण घेणार तो वेळ आधी ठरवावा.
           याशिवाय अनेकदा ऐनवेळी काही प्रसंग, घटनांना अनपेक्षितपणे कार्यक्रमातील वेळ द्यावा लागतो. अशावेळी काही प्रमाणात ती वेळ भरुन काढण्यासाठी निवेदनात कपात करणे क्रमप्राप्त ठरते. हे करताना कार्यक्रमाचा आशय, व्याप्ती यावर परिणाम होणार नाही याची *सूत्रसंचालकाने* काळजी घ्यावी.
        दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, स्वागत- सत्कार , प्रकाशन यामध्ये जाणाऱ्या वेळासाठी आपलं निवेदन तयार असावं अन्यथा ती वेळ निवेदनाशिवाय नीरस जाण्याची शक्यता असते.

*कार्यक्रम-पत्रिका आणि नियोजीत वेळ यांचा समन्वय*

         कार्यक्रमासाठी निश्चित केलेला कालावधी आणि प्रत्यक्ष लागणारा वेळ याचा अंदाज कार्यक्रम पुढे नेताना सूत्रसंचालकाने घ्यावा. आपण वेळेचे बांधील आहोत म्हणून पुढे जाणाऱ्या वेळेसाठी निवेदनात घाई करणे, गडबडीने बोलणे टाळावे. त्याऐवजी निवेदनातला एखादा मुद्दा वगळणे अधिक योग्य.
     नियोजित वेळेच्या आत कार्यक्रम संपतो की उशीर होतो याचा अंदाज घेऊन आयोजकांच्या सहमतीने आवश्यक तेथे बदल करावे.
            वक्त्यांना माईकजवळ येण्यास उशीर लागणे, कधी- कधी निवेदकाच्या मागे वक्ता येऊन उभा राहणे, वक्त्यांची लांबत जाणारी भाषणे, बक्षीस वितरण कार्यक्रमात लागणारा भरपूर वेळ इत्यादी गोष्टी निवेदकाची परीक्षा घेणाऱ्या असतात. अशावेळी संयमाने प्रसंग हाताळण्याचे कौशल्य *सूत्रसंचालकाकडे*असणे आवश्यक आहे.
       सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांना लोकप्रिय वक्ता,सेलिब्रिटी यांना ऐकण्याची उत्सुकता असते. अशावेळी *सूत्रसंचालकाने*श्रोत्यांची मानसिकता ओळखून त्यांना अधिक वेळ कसा दिला जाईल असा प्रयत्न करावा.
............................................
१ )

*"रंगुनी रंगात साऱ्या*
 *रंग माझा वेगळा,*
*गुंतुनि गुंत्यात साऱ्या*
*पाय माझा वेगळा.*
*भोग जे येती कपाळी,*
*ते सुखाने भोगतो.*
*अन कळ्या झाल्या कधीच्या,* *सोशिल्या ज्याच्या कळा."*
                                                               
                           *-सुरेश भट*

२ )

*"धावण्याचे वेड होते,*
*थांबण्याचे भान होते.*
*पोळताना बहरण्याचे*
*वेगळे आव्हान होते.*
*स्वर्ग हाती येत होता*
*त्याच वेळी थांबलो*
*धावणेही छान होते,*
*थांबणेही छान होते."*

             *-ज्ञानेश वाकुडकर*

*क्रमशः...........................*
🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍✍✍

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*

*📱         9423445668*             
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*       
                                                                                                        *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

    *🖱पोस्ट क्र 1⃣7⃣🖱*

*गुरूवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१८*

      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
            मित्रहो,वक्ता म्हणून ज्या कार्यक्रमात भाषण करायचे असते त्या कार्यकमाचे स्वरूप माहित करुन घेणे जसे वक्त्याला आवश्यक आहे, तसेच *सूत्रसंचालकानेही* ते जाणून घेणे आवश्यक ठरते.
        कार्यक्रम सभागृहात, मैदानावर, शाळा- महाविद्यालयात, कार्यालयात इत्यादींपैकी कोठे आहे त्यानुसार सूत्रसंचालकाने तयारी करणे आवश्यक आहे. आपल्या कार्यक्रमपत्रिकेचा ( संहिता ) ढोबळ आराखडा तयार करण्यापासून त्याची सुरुवात होते.

*सूत्रसंचालनाचे व्यवस्थापन*

सूत्रसंचालनाचे नियोजन करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

१ ) *का?*

आपण ज्या कार्यक्रमात *सूत्रसंचालक*म्हणून भूमिका पार पाडणार आहोत, तो कार्यक्रम आयोजित करण्याचा *उद्देश* अगोदर समजून घेणे गरजेचे आहे.
नियोजित कार्यक्रमात *सूत्रसंचालक* म्हणून आपली भूमिका कोणत्या पद्धतीने पार पाडायची आहे याचे नियोजन महत्वाचे आहे. कार्यक्रमाचा उद्देश मनोरंजन, एखाद्या विशिष्ट विषयावरचे भाष्य किंवा यापेक्षा अजून काही?याची पूर्ण माहिती *सूत्रसंचालकाने* अगोदर करुन घ्यावी व त्यानुसार प्रत्यक्ष निवेदनाची तयारी करावी, म्हणजेच आपण नेमके काय करणार याची जाणीव असावी.

२ ) *कोण?*

*सूत्रसंचालक* म्हणून आपण ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहोत त्याठिकाणी निमंत्रित पाहुणे आणि श्रोते *कोण/ कसे* ( पद, व्यवसाय,वयोगट, शैक्षणिक स्तर) आहेत याविषयी माहिती करुन घ्यावी. श्रोत्यांची मानसिकता आणि आकलनशक्ती यांचा अंदाज घेण्याचे कसब सूत्रसंचालकाजवळ असलेच पाहिजे.
       श्रोत्यांच्या वयोगटानुरुप भाषणशैली, शैक्षणिक स्तरानुसार आशयमांडणी, स्थानिक भाषेचा आवश्यकतेनुसार वापर ह्या बाबी परिणामकारक निवेदनासाठी आवश्यक ठरतात.

३ ) *कसे?*

*सूत्रसंचालक* म्हणून आपल्याला मिळालेली *वेळ,* आपण जिथे बोलणार आहोत ते कार्यक्रमाचे *स्थळ* आणि दोन वक्त्यांच्यामध्ये आपण जे निवेदन करणार आहोत त्याचे *स्वरूप* ह्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत. कार्यक्रमाचे प्रत्यक्ष व्यवस्थापन करताना ह्या तिनही बाबींचे भान ठेवणे आवश्यक आहे.
          कुठल्याही कार्यक्रमात *सूत्रसंचालकाने* अगोदर केलेल्या नियोजनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रसंगावधान राखून त्याला तो कार्यक्रम सहज गुंफता येणे आवश्यक आहे.
               थोडक्यात, *सूत्रसंचालक* हा त्या कार्यक्रमाची उंची वाढविण्याच्या भूमिकेत वावरणारा असावा.एकाचवेळी मंचावरील मान्यवर, समोर बसलेले श्रोते आणि आजूबाजूला असलेले आयोजक यांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच स्वतःच्या निवेदनशैलीची सर्वांवर छाप पाडण्याचे दिव्य त्याला पार पाडावे लागत असते.
       *सूत्रसंचालकाची* भूमिका या पद्धतीने कार्यक्रम सहज पुढे नेण्याची असते.
............................................

१ )
*"आयुष्याचे सुरेल गाणे,*
 *केव्हा झाले कळले नाही.*
*जगण्याला या फुल सुगंधी*
*केव्हा आले कळले नाही."*
                        -अरुण सांगोळे
                               अमरावती

२ )
*"नफ़रत करनेवालों के भी*
*सीनों को महकाएंगे,*
*आओ हम भी अंगारोपर*
*फूल खिलाकर देखेंगे ॥"*
              -डॉ गणेश गायकवाड
                          बुलडाणा

*क्रमशः...........................*

🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍✍✍

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*

*📱         9423445668*             
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

▬▬▬✺❂۩ *MSP* ۩❂✺▬▬▬   
                                                   
     *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*
(शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* च्या व्हाटसअॅप गृपवर)

      *🖱पोस्ट क्र 1⃣8⃣🖱*
*गुरूवार दिनांक १ मार्च २०१८*

     *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
            मित्रहो, *सूत्रसंचालन* हे भाषणकलेचे एक रुप आहे. हे आपण स्वीकारलेलच आहे.

*"जर एखादा कार्यक्रम यशस्वी, दर्जेदार आणि लोकप्रिय  बनवायचे असेल तर एक सूत्रसंचालक निवडा आणि जर कार्यक्रम अयशस्वी आणि सुमार बनवायचा असेल तरीही एक सूत्रसंचालक निवडा."*

          यावरुन सूत्रसंचालन किती महत्त्वपूर्ण ठरते हे आपल्या लक्षात येईल. सूत्रसंचालकाने ठरविल्यास मृतप्राय कार्यक्रमात प्राण आणू शकतो आणि सूत्रसंचालकाने ठरविल्यास यशस्वी कार्यक्रमासही तो मृतप्राय बनवू शकतो. एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार?यावरही त्या कार्यक्रमाचा प्रतिसाद अवलंबून असतो.

*सूत्रसंचालक* म्हणजे ANCHOR.
        अँकर ह्या शब्दामध्ये आलेली सहा इंग्रजी अक्षरे म्हणजे सूत्रसंचालकाच्या व्यक्तीमत्त्वाचे सर्वात महत्त्वपूर्ण गुण.

*A               Applies mind*

          प्रत्येक कार्यक्रमात यशस्वी सूत्रसंचालक आपल्या बुध्दीचा सर्वोत्तम वापर करत असतो. आपण हया कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास असतो.

*N            Novelty*

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी सूत्रसंचालक सतत नवीन पद्धती, नवीन मार्ग शोधून काढतो.नाविण्यपूर्ण शैली, समयसूचकता याद्वारे तो कार्यक्रम फुलवितो.

*C            Courtesy*

           सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असतो. सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असते.त्यामुळे त्याच्या वर्तनातून नम्रता, शिष्टाचार आणि सभ्यता यांचे प्रदर्शन होत असते. कार्यक्रमात सहभागी मान्यवर आणि श्रोते याबाबींची आवर्जून दखल घेतात.

*H              Homework*

              सूत्रसंचालक कार्यक्रमाच्या सर्व टप्प्यांवर परिपूर्ण लक्ष ठेवून त्यादृष्टीने नियोजन आणि उत्कृष्ट सादरीकरणाची पूर्वतयारी करतो. विशिष्टप्रसंगी करावयाचे निवेदन, सादर करावयाचे संदर्भ यांची पूर्वतयारी त्याने केलेली असते.

*O         Originality*

           सूत्रसंचालकाची स्वतःची एक विशिष्ट ओळख त्याच्या स्वतंत्र अशा शैलीने निर्माण झालेली असते. त्याची भाषाशैली, संवादकौशल्य ह्या बाबी स्वयंनिर्मित असतात. कोणाच्यातरी शैलीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सूत्रसंचालकाला दीर्घकाळ मदत करु शकत नाही. त्याची विशिष्ट शैली हीच त्याची ओळख असते.

*R          Ready for Show*

              सूत्रसंचालक हा कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडण्यास आणि प्रभावी प्रदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असतो. क्वचितप्रसंगी कार्यक्रमादरम्यान व्यत्यय आणणाऱ्या बाबी घडल्या तरीही सूत्रसंचालक धिटाईने त्यांना तोंड देतो.
............................................
१ )
*" आल्यासारखे प्रेमाने एखादे गाणे ऐकवून जा, अंधाराच्या राज्यात प्रकाश उजळून या. मनाचा कोपरा कोपरा झगमगू दे, आपल्या बोलांनी मनात एक दिवा पेटवून जा.*
                            -संकलित
२)
*''कोणती ना जात त्यांची,* *कोणता ना धर्म त्यांना,*
*दुःख भिजले दोन अश्रू,*
*माणसाचे माणसांना.*
*मोडलेल्या माणसांचे,*
*दुःख ओले झेलताना,*
*त्या अनाथांच्या उशाशी,*
*दीप लावू झोपताना.*
                                                         
              - संकलित
       🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
             *अरविंद शिंगाडे*
       *खामगाव जि.बुलडाणा*
         *📱9423445668* 
arvind.shingade@gmail.com

दै. सकाळमध्ये प्रकाशित झालेल्या *'ऑफ पिरियड'* या माझ्या शैक्षणिक सदरातील लेख वाचण्यासाठी
*जीवनगाणे*
arvind1575.blogspot.com  या ब्लॉगला अवश्य भेट द्या.       
     *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत)*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*

*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*       
                                                                                                        *🎤सूत्रसंचालनाची सूत्रे🎤*

( शिक्षक, विद्यार्थी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून नेतृत्वगुण प्राप्त करु इच्छिणाऱ्या सर्वांसाठी.......... साप्ताहिक लेखमाला दर गुरुवारी फक्त *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*च्या व्हाटसअॅप गृपवर)

    *🖱पोस्ट क्र 1⃣9⃣🖱*

*गुरूवार दिनांक ८ मार्च २०१८*

      *🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*


            *तणावरहीत आणि सहज सूत्रसंचालन*

    कार्यक्रमस्थळी आयोजकांनी *सूत्रसंचालक* म्हणून तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे, विश्वासपूर्वक संपूर्ण कार्यक्रम तुमच्या हाती दिलेला आहे याचा अर्थ सर्व श्रोत्यांना आणि आयोजकांना तुम्हाला यशस्वी झालेलं बघायचं आहे. *सूत्रसंचालकामध्येच* ते आपलं यश बघत असतात. मग माईकसमोर यशस्वी सादरीकरण करण्याची आणि कार्यक्रम फुलविण्याची जबाबदारी *सूत्रसंचालकाची* आहे.

*आपली तयारी किती आहे?*

      *सूत्रसंचालनाचा* आराखडा तयार करताना त्यामध्ये महत्त्वपूर्ण संदर्भ, मुद्दे कोणते आहेत? कोणत्या म्हणी, काव्यपंक्ती आणि शेरोशायरी आपण म्हणणार आहोत ?हे सर्व फक्त *सूत्रसंचालकालाच* माहित असते.
     अनेकदा आपण ठरविलेला आराखडा तसाच राहतो आणि वेळेवर काहीतरी कारणामुळे कार्यक्रमाची रूपरेषाच बदलून जाते. अशावेळी आपल्या सर्व नियोजनाचा समावेश कार्यक्रमात व्हावा म्हणून *सूत्रसंचालकाने* आग्रही असूं नये.जे आवश्यक आहे तेवढेच प्रभावी स्वरुपात सांगावे.
        अगदी सुरुवातीच्या काळात *सूत्रसंचालक* म्हणून माईकला सामोरे जाताना घाबरणे, घसा कोरडा पडणे, हातपाय थरथरणे, विस्मरण होणे, आवाज कापरा होणे, आत्मविश्वास कमी होणे असे अनुभव प्रत्येकाला येतात. *सूत्रसंचालक* म्हणून कार्यक्रम स्विकारतानाच आपण खूप मोठी हिंमत केलेली असते. प्रत्येक कार्यक्रम हा काहीतरी नवीन शिकवून जात असतो. या गोष्टींशिवाय *सूत्रसंचालक* म्हणून आपण पुढे जाऊं शकत नाही. त्यामुळे ह्या सर्व बाबी हळूहळू दूर करण्याचे सामर्थ्य आपल्यात नक्कीच आहे.याची *सूत्रसंचालकाने* जाणीव ठेवावी.
ही भीती घालविण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी केल्या तर निश्चित फायदा होतो.

*नैसर्गिक व्हा*

    आपण आपले कुटुंब, मित्र यांच्यामध्ये किती सहज बोलतो? कुठलाही ताणतणाव नसतो, कोणाची नक्कल न करता आपण आपल्या नैसर्गिक शैलीत बोलतो. मग स्टेजवर जातानाही भीती आणि कृत्रिमता झटकून टाकावी आणि माईकसमोर नैसर्गिक व्हावे. आपली ओळख न बदलता आपली शैली बनवा, नैसर्गिकरित्या हसा. आपोआप ताण कमी होईल. त्यामुळे *सूत्रसंचालनसुद्धा* तुमच्या स्वतंत्र, नैसर्गिक शैलीत होईल. जे सहज, सुंदर आणि फक्त तुमचेच असेल.
                              *क्रमश:*
.............................................

*"हे खरे -मी संत नाही,*
*वा कुणी भगवंत नाही,*
*मात्र इतुके जाणतो की,*
 *राख म्हणजे अंत नाही"*
       - ज्ञानेश वाकुडकर


*"आधी समुद्र प्यावा मग लाभते प्रशस्ती,*
*काठावरी बसून का होतो कुणी अगस्ती "*
                    -सतीश दराडे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🗞━━━━♍💲🅿━━━━🗞
     *✍🏻✍🏻✍✍✍✍✍

    *अरविंद शिंगाडे*
*. खामगाव जि.बुलडाणा*

*📱         9423445668*   
arvind.shingade@gmail.com

दै. सकाळमध्ये प्रकाशित झालेल्या *'ऑफ पिरियड'* या माझ्या शैक्षणिक सदरातील लेख वाचण्यासाठी
*जीवनगाणे*
arvind1575.blogspot.com  या ब्लॉगला अवश्य भेट द्या.       
*🏡महाराष्ट्र शिक्षक पँनल🏡*

*🏵═══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*
*(लेखक सुप्रसिद्ध वक्ते व सूत्रसंचालक आहेत.  )*
*
*🏵══┅┄🌀☀🌀┄┅══🏵*


उर्वरीत भाग आदरणीय श्री अरविंदभाऊ यांच्याद्वारे प्रसिद्ध झाल्यावर !
धन्यवाद !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा