पृष्ठे

NISHTHA प्रशिक्षण

मित्रांनो ,
राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ . १ ली ते इ . ८ वीस अध्यापन करणाऱ्या १०० % शिक्षक , मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी NISHTHA National Initiative for School Heads ' and Teachers ' Holistic Advancement ) या प्रशिक्षणाच्या राज्यस्तरीय व तालुकानिहाय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे .
महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे आपणासाठी सादर आहे काही मार्गदर्शक बाबी !
निष्ठा (NISHTHA) प्रशिक्षण ?
मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने देशभरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी निष्ठा (NISHTHA - National Initiative for School Heads and Teachers Holistic Advancement) हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात आलेला आहे. सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी माहे डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये करण्यात येणार आहे.
NISHTHA या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख हेतू शालेय शिक्षणामधील गुणवत्ता वाढविणे हा आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीसाठी अध्यापन करणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक,पर्यवेक्षीय यंत्रणा व प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी एकत्रितपणे प्रशिक्षणाची रचना करण्यात आलेली आहे. या NISHTHA प्रशिक्षण कार्यक्रमासाठी NCERT, नवी दिल्ली यांचे मार्फत नव्याने वेब पोर्टलची निर्मिती करून सदरच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व प्रशिक्षणाचे साहित्य, प्रशिक्षणाबाबतचे अभिप्राय व प्रशिक्षणाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे; तसेच यासाठी गुगल प्ले स्टोअरवर NISHTHAसाठीचे android app देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सदरच्या प्रशिक्षणासाठी सहभागी राज्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होत असणाऱ्या सर्व शिक्षकांची सदरच्या पोर्टलवर नोंद करणे गरजेचे आहे. याच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची नोंद, प्रशिक्षणासाठीची पूर्व चाचणी, उत्तर चाचणी, चर्चा सत्रांचे स्वरूप व त्यामधील सहभाग, त्याचबरोबर प्रशिक्षणामधील सर्वोत्तम उपक्रम यांचे संकलन केले जाणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर २,५५,८२३ प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षीय यंत्रणा यांना एकूण ५ दिवसांचे प्रशिक्षण  देण्यात येणार असून यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, समता, शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य, कला शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, शालेय नेतृत्व विकास अशा घटकांचा सर्वकष विचार करून प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय स्तरावरून नियोजित NISHTHA हा सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम असून यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास वाव मिळेल.
NISHTHA module 7 -Click here
NISHTHA of communication -Click here
NISHTHA प्रशिक्षण वर्गाचे आयोजनासंदर्भात
खर्चाचे निकष -Click here
NISHTHA app -Click here

धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा