पृष्ठे

PRC दौरा मार्गदर्शन

मित्रांनो ,
आपणांसाठी महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे सादर आहेत PRC दौऱ्यानिमित्य महत्वपूर्ण मार्गदर्शक  बाबी !!!
 🌷🌹P R C दौरा बाबत अत्यंत महत्व पूर्ण सुचना 🌹🌷

🔷सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळांसाठी🔷

🔳१) आपल्या हजेरीपटावर एकावेळी एकच स्वाक्षरी करावी

🔲२)हजेरीपटावरील संपुर्ण रकाने हजेरी भरतांनाच पूर्ण भरावेत, हजेरी P (present)आणि A(Absent) अशीच लिहावी

🔳३)वर्गात शै. साहित्य विषयवार लावुन ठेवावे,नसतील खरेदी किंवा हाताने करून लावणे बंधनकारक आहे ( दोरी,तार,किंवा चिकटुन लावावे ) वर्गातील शैक्षणिक साहित्य बाबत मुलांना माहिती असावी

🔲५)ज्ञानरचनावाद ह्या शब्दाचा अर्थ व उदा. सांगता यावे,आपण त्या दिवशीच्या पाठाची तयारी करून ठेवावी

🔳६)विज्ञान व गणित पेटीचा वापर करावा, कुलुपबंद ठेवु नये

🔲७) शालेय परिसर ,वर्ग ,कोपरे स्वच्छ ठेवावेत

🔳८)मुलांना गणवेशात ठेवावे जेवणापूरवी साबन,हात धुवुन,व रांगेत बसवावे, ताटाचा वापर करावा, श्लोक म्हणावा

🔲९) परिपाठ-प्रार्थना पुर्व तयारी करावी, दै नोदी ठेवावी माहेवारी नेहमी साठीच आवश्यक आहे

🔳१०)वार्षिकनियोजन, घटकनियोजन, मासिकनियोजन वेळापत्रक मु अ च्या स्वाक्षरी निशी वर्गातच असावे वर्गाची पाटी, वर्गशिक्षकाचेनाव, मु अ पाटी मु अ चे नाव असावे ,

🔳११) अप्रगत ची यादी मु अ कार्यलयात लावावी ,सुचनेचे अनुपालन झाले नाही जि प व प स सदस्याना यादी द्यावी ती आपली जबाबदारी राहिल

🔲१२)३२व ३३ नंबर रजिस्टर अद्यावत करुन ठेवावे,

🔳13)२००९/१० या शै वर्षापासुनचे सर्व किर्द,पासबुक,ठराव रजिस्टर, लाल कापडात ई स टाकुन सापडेल आशा ठिकाणी ठेवा ,चाबी विसरू नका,

🔲१४)स्वच्छता संकुल वापरात ठेवावे ,आहे त्या परिस्थितीत त्यावर नावे लिहुन ठेवा मुलाचे/मुलींचे

🔳१५)रेडिअो,टि व्हि ,कॉम्पुटर,व इतर साधनाचा वापर करत आसालतर ईतिव्रतात लिहुन ठेवावा ,काय दाखवले, का़य शिकविले, दिनांक वार असावे.

🔲१६)शाळेत 6 :45 ते 12 अाणि 10:00 ते 5 उपस्थित रहावे, मु अ नी कोणालाही 5 च्या आगोदर सोडु नये शाळेची वेळ विद्यार्थीना सांगता यावी

🔳१७)शाळेसमोर गाड्या लावु नयेत.कारण आपण मुख्यालयी राहतो.

🔲१९) सर्वात महत्वाचे सर्व अधिकारी आमदार,जि प ,पस सदस्य, यांना आदरयुक्त बोलावे,आवश्य तेवढेच बोलावे,विचारले तेवढेच सांगा,मला माहित नाही,मी मुअ नव्हतो,आजच ,काल परवाच चार्ज दिला ,घेतला,मी प्रभारी आहे असे काही म्हणु नका वेळ आहे माहिती करून ठेवा ,संकलन जवळ ठेवा,सर्व तयारी आजच करा विनाकारण फजिती नको.मु अ बोलत असतांना मध्ये च बोलू नये . आपला वर्ग सोडुन कार्यालयात जावु नये ..वर्गात फलकलेखन करावे विद्यार्थी पट,हजर,गैरहजर, तारीख लिहावी

🔳 20)शालेय पोषण आहार मेनुनुसार शिजवावा ,नमूना काढून ठेवावा, सर्व माल कोरडया ठिकाणी साफ करून ठेवा,expiry झालेला माल परत करा, दैनंदिन नोंदी करा, चव रजिस्टर. नोंदी ठेवा

🔲21)विशेष बाबी मु अ कार्यलयात असावे

🔳22)कार्यालयात सर्व समिति फलक अद्यावत करुन ठेवावे, सर्व समिति सभांचे इतिवृत नियमित करून ठेवा

🔲23)वार्षिक तपासणी मधील सूचनांचे पालन केलेले असावे

सोबतच खालील बाबी सुद्धा आवश्यक !
💥💥💥💥💥💥💥💥💥💥

*PRC आगमन /स्वागतपर सूचना*

🌹🏵🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🏵🌹

*अपेक्षित भेटी* - शाळा, PHC, ग्रामपंचायत, अंगणवाडी, पशु दवाखाना, उपकेंद्र.
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
▶शालेय परिसर अत्यंत स्वच्छ ठेवावा.
▶प्रवेश द्वारावर रांगोळी घालावी, पान, फ़ुल, शंख शिंपले ई. उपलब्ध साहित्य ....
▶आपल्या शाळेत मान्यवर  आल्यास त्यांचे स्वागत उपलब्ध पुष्पगुच्छ देऊन (स्थानिक परिस्थिती नुसार) किंवा Hand  made शुभेच्छा पत्र देऊन करावे, प्रवेशद्वारावर मु.अ. यांनी करावे. (मुलांच्या हस्ते वर्गात करावे).
  ☄👇🏻 *प्रत्येक वर्गात हे असावे* 👇🏻☄
▶ वेळापत्रक , कॅलेंडर , शैक्षणिक साहित्य, विषय कोपरा, आरसा, कंगवा, नेलकटर, तरंग वाचनालय, कचरापेटी, रुमाल, महापुरुषांचे फोटो.
▶ गणित पेटी, भाषा पेटी मधील साहित्य उघडून रचनाकार ठेवावे.
▶ प्रत्येक साहित्याची माहिती शिक्षकाला असावी.
▶ वर्गातील फोटोबाबत  शिक्षक, विद्यार्थी यांना माहिती असावी.
▶शाळेत असलेले सर्व फळे स्वच्छ पुसून त्यावर शैक्षणिक माहिती, अध्ययन विषयक मजकूर, उपक्रम माहिती लिहून ठेवावी.
▶ सर्व मुले स्वच्छ शालेय गणवेष घालून असावी.
▶ शिक्षकांनीसुद्धा आपल्या पेशाला शोभेल असा पोशाख परिधान करावा.
▶ जिल्हा, राज्य स्तर अधिकारी, पदाधिकारी यांची माहिती सर्व शिक्षकांना असावी. (किमान शैक्षणिक क्षेत्र).
▶ PRC चमू शाळेत आल्यावर अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जावे घाबरुन, गोंधळून जावु नये
अगदी खरी उत्तरे द्यावी.
▶ शा.पो.आ नोंद भरून अचूक ठेवाव्यात.
▶ विद्यार्थी उपस्थिती 100% असावी.
▶ हजेरी आणि प्रत्यक्ष विद्यार्थी तंतोतंत जुळली पाहिजेत.
▶ Hand Wash Station स्वच्छ असावे तेथे साबण, नेपकिन्स ठेवावे, नळ वाहते ठेऊ नये, प्रत्येक नळाला तोटी असावी
▶ ई-लर्निंग साधने सुरू असल्याची खात्री करावी.
▶ वर्गातील बैठक व्यवस्था नीटनेटकी आणि वर्गानूकूल असावी. इ. 1ली व 2 री ला शक्यतोवर  गोलाकार रचना असावी.
▶ वर्गात रेखाटन केलेल्या रचनावादी आकृतीचा सराव आज करून घ्यावा त्या साहित्याची व्यवस्थित मांडणी करून ठेवावी
▶ वर्गानूसार, त्यांच्या क्षमतेनुसार मूलभूत क्रिया (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार) किमान यायला हवी
वाचन सराव करून घ्यावा.
▶ विद्यार्थ्यांना स्वतःचा परिचय देता यावा.
▶ विद्यार्थी, शिक्षक यांना ओळखपत्र असावे.
▶ मान्यवर यांनी जेवढी माहिती विचारली तेवढीच माहिती व उत्तरे द्यावीत.
 ▶ अडगळीचे कुठलेही सामान असू नये.
▶ शा.पो.आ. मेनूनुसार देण्यात यावा, किचन शेड, धान्यसाठविण्याची जागा स्वच्छ असावी, नमूना पारदर्शक प्लॅस्टिक डब्यात साठवून ठेवावा,नोंद वह्या अद्ययावत असाव्यात.
 ▶ ई- लर्निंग साहित्याच्या सॉफ्टवेअरची माहीती असावी.
 ▶ वार्षिक नियोजन व पाठ टाचन ठेवावे.
▶ शै.साहित्य गणित, भाषा पेटी याचा वापर वाढवावा कुलूप बंद ठेनू नये.
▶ सर्व अभिलेखे व नोंदवहया अद्यावत करून इंडेक्स नुसार लावलेली असावी.
▶डेस्क बेंच निट रचनाकार असावेत.
▶सन 2014 -15 पासून सर्व अभिलेखे लावलेले असावे, मागितल्यास लगेच काढून दाखवता येईल असे ठेवावेत कपाटावर अभिलेख अणुक्रमणिका (index) लावलेली असावी.
▶ शा.पो.आ. स्वयंपाकी, व मदतनिस यांना शाळेत दिवसभर उपस्थित ठेवावे, त्यांना धाण्यादी माल, तेल डाळ, मीठ, मसाले भाजी या घटकाचे प्रमाण माहिती असावे.
▶ बुधवार रोजी पूरक आहार द्यावा व नोंद ठेवावी  .
@@@@@@@@@@@@@@@@@@

📘 *सर्व सूचना मा. गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहेत.*
----------------------------------------------------------
*सर्व शिक्षकांना महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे  हार्दिक शुभेच्छा.* 👍🏻
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आणखी महत्वपूर्ण बाबी इमेज रूपात आपणांसाठी सादर !






सर्वांना PRC दौऱ्यानिमित्य महाराष्ट्र शिक्षक मित्र परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा